महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3

Maharashtrachya Itihasatil Mahatvaache Mudde Bhag 3

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3

  • इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला.
  • उमाजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले.
  • उमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली.
  • नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.
  • 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईकला फाशी देण्यात आली.
  • कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटिशांविरोधी रामजी भांगडि याच्या नेतृत्वाखाली उठाव केला.
  • पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.
  • ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.
  • स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास  पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे.
  • सातार्‍याचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.
  • 1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.
  • नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता.
  • 13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला.
  • 1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्‍यांनी सावकार विरुद्ध केलेले उठाव होत.
  • वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील ‘सिरधोण’ येथे झाला.
  • गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून ‘ऐक्यवर्धणी’ ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 ‘पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन’ ही शाळा सुरू केली.
  • 20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी, महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.