Current Affairs (चालू घडामोडी) of 6 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. जमशेदजी टाटा यांच्या सन्मानार्थ नाणी चलनात आणणार
2. ‘लोकसत्ता’चे अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट’ पुरस्कार
3. विकास महाडिक यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार
4. सरिता पदकी यांचे निधन
5. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पानगढिया
6. दिनविशेष

 

 

 

 

जमशेदजी टाटा यांच्या सन्मानार्थ नाणी चलनात आणणार :

  • भारतीय उद्योगक्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या 175व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने त्यांची मुद्रा असणारी नाणी चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • अशाप्रकारे पहिल्यांदाच चलनी नाण्यांवर एखाद्या उद्योगपतीची मुद्रा छापण्यात येणार आहे.
  • मेक इन इंडिया‘ अभियानातंर्गत देशातील उद्योगपतींना प्रेरणा मिळावी, असा उद्देशही साध्य करण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करणार आहे.
  • 6 जानेवारी रोजी पंतप्रधान निवासस्थानी या नाण्यांना प्रकाशित करण्यात येणार आहे.
  • आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिक, शास्त्रज्ञ, एखादी संस्था किवा घटनेच्या स्मरणार्थ सरकारने चलनी नाणी बाजारात आणली आहेत.

‘लोकसत्ता’चे अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट’ पुरस्कार :

  • ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट‘ सन्मान जाहीर झाला.
  • पर्यावरण, पाणी, वातावरणातील बदल आणि निसर्गसंवर्धन आदी विषयांवरील सातत्यपूर्ण लेखन आणि पर्यावरण जागृतीसाठी पूरक काम केल्यामुळे घोरपडे यांना हा पुरस्कार करण्यात येणार आहे.
  • नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 16 ते 23 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे.
  • या वर्षीचा यंदाचा महोत्सव विषय ‘शून्य कचरा : सुरवात स्वतःपासून‘हा असणार आहे.

विकास महाडिक यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार :

  • महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या वतीने कोकण विभागासाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘दर्पण’ पुरस्कार या वर्षी विकास महाडिक यांना जाहीर झाला.
  • 6 जानेवारी 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणार आहे.

सरिता पदकी यांचे निधन :

  • ज्येष्ठ कवयित्री, कथालेखिका आणि बालसाहित्यकार सरिता पदकी (वय 85) यांचे वृद्धापकाळाने अमेरिकेमध्ये निधन झाले.

नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पानगढिया :

  • योजना आयोग बरखास्त करून स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरविंद पानगढिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय आणि डिआरडिओचे माजी प्रमुख व्ही.के.सारस्वत यांना पंतप्रधान आयोगाचे पूर्णवेळ सदस्य नियुक्त केले आहे.
  • केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुरेश प्रभू, राधामोहन सिंग यांना आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे.
  • नितिन गडकरी, स्मृती इराणी थावरचंद गहलोट हे विशेष निमंत्रक म्हणून काम पहातील.

दिनविशेष :

  • 6 जानेवारीपत्रकार दिन

    1664 – मराठी सैन्य सुरतेत शिरले.

  • 1832 – बाळशास्र्यी जांभेकर संपादित ‘दर्पण‘चा पहिला अंक मुंबईत प्रसिद्ध झाला.
  • 1924 – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.