Current Affairs of 31 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2017)

भारत सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणारा देश :

  • दुचाकी उत्पादनांच्या निर्मितीत भारताने चीनला मागे टाकले आहे.
  • 2016-17 या कालावधीत भारताने चीनपेक्षा अधिक दुचाकींचे उत्पादन केले.
  • चीनच्या तुलनेत भारताने 9 लाख अधिक दुचाकींची निर्मिती केली आहे.
  • चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
  • भारतात 2016-17 मध्ये 1.75 कोटी दुचाकी विकल्या गेल्या असून हादेखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक विक्रम आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2017)

सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे :

  • तमिळनाडू राज्यातील मदुराई येथे कार्यरत असलेल्या उपळाई बुद्रूकच्या कन्या तथा अप्पर जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची नुकतीच सेलम जिल्ह्याच्या (तमिळनाडू) जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सेलम जिल्ह्याच्या त्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत.
  • रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या 2008 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 118 व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांची तमिळनाडू राज्यात नियुक्ती करण्यात आली होती.
  • मदुराई जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेली च्या उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
  • रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी मुदुराई जिल्ह्यात माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘मनरेगा’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते ‘स्वच्छता चॅम्पियन्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने त्यांना सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सेलम जिल्ह्याच्या त्या 171 व्या जिल्हाधिकारी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्‍समध्ये सहभागी होणार :

  • 3 ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली.
  • डोकलामवरून निर्माण झालेला भारत-चीन यांच्यातील वाद 28 ऑगस्ट रोजी सैन्य माघारीच्या निर्णयानंतर निवळलेला असताना मोदींच्या चीन दौऱ्याची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीन अध्यक्षाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या ब्रिक्‍स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या फजियान प्रांतातील शियामेन येथे जाणार आहेत.
  • चीन दौरा आटोपल्यानंतर मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमार देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्यानमारचे अध्यक्ष यू थिन क्वा यांच्या निमंत्रणावरून मोदी जात आहेत.
  • तसेच पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच द्विपक्षीय म्यानमार दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये असियान शिखर संमेलनासाठी म्यानमारला गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदी स्टेट काऊन्सिलर डॉ आंग सान सू की यांच्यामवेत चर्चा करणार आहेत.

उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र झेपावले :

  • उत्तर कोरियाने राजधानी प्यांगयांगहून सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसेफिक महासागरात जाऊन कोसळळे.
  • अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानवरूनच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडल्याने या भागात तणाव वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
  • जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरून चाळीस मिनिटे चर्चा केली.
  • अमेरिकेच्या व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने उत्तर कोरियावर दबाव वाढविला जाणार असल्याचे ऍबे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
  • अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राने 2700 किलोमीटरचा प्रवास केला.
  • जपानच्या उत्तरेकडून होकाईदो बेटावरून पहाटे सहा वाजून दोन मिनिटांनी साधारणपणे 550 किलोमीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र झेपावले.
  • तसेच या क्षेपणास्त्राचा वेग ताशी बारा हजार किलोमीटर इतका अफाट होता.

दिनविशेष : 

  • ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या अमृता प्रीतम यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.
  • रशियाअमेरिका या देशांदरम्यान 31 ऑगस्ट 1963 रोजी ‘हॉट लाईन’ सुरु करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.