Current Affairs of 3 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2016)

डॉ. लकडावाला यांना भारत आयकॉन पुरस्कार :

  • सेंटर फॉर ओबेसिटी अ‍ॅण्ड डायजेस्टिव्ह सर्जरीचे संस्थापक डॉ. मुफ्फझल लकडावाला यांना बेस्ट ओबेसिटी सर्जन या विभागात भारत आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • डॉ. मुफ्फझल यांनी 15 वर्षांच्या करिअरमध्ये देशासह परदेशात लठ्ठपणासाठी विविध शस्त्रक्रिया केल्या आहेत.
  • बेरॅट्रिक सर्जरी आणि जीआय ओन्कोलॉजी सर्जरी यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे.  
  • ‘इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ ओबेसिटी अ‍ॅण्ड मेटाबोलिक डिसॉर्डर’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
  • मे 2016 मध्ये ‘द इट-राईट प्रिस्क्रिप्शन’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
  • डॉ. मुफ्फझल यांनी आशिया खंडातील सर्व देशांमध्ये शस्त्रक्रिया केल्या आहेत.
  • देशातील पहिली लेप्रोस्कोपीक गॅस्ट्रिक बायपास डॉ. मुफ्फझल यांनी केली आहे.

सीबीआयचे हंगामी संचालक राकेश अस्थाना :

  • सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा 2 डिसेंबर रोजी निवृत्त झाले असून, त्यांचा उत्तराधिकारी ठरला नसला तरी, राकेश अस्थाना यांच्याकडे प्रभारी संचालक म्हणून सूत्रे देण्यात आली आहेत.
  • राकेश अस्थाना सध्या सीबीआयचे अतिरिक्त संचालक असून, अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत चौकशीसाठीच्या विशेष पथकांचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. ते प्रमुख 1984 च्या गुजरात तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • अनिल सिन्हा यांच्या जागी विशेष संचालक आर.के. दत्ता यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा असतानाच दत्ता यांची गृहमंत्रालयात विशेष सचिव म्हणून बदली करण्यात आली.
  • राकेश अस्थाना यांनी दहा वर्षे सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले आहे.

‘आधार’ कार्डव्दारे होणार आर्थिक व्यवहार :

  • केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार देशात कॅशलेस अर्थव्यवस्था आणण्यासाठी नवे पाऊल उचलण्यात आले असून, आता आधार कार्डाच्या साह्याने बँक व्यवहार करता येतील.
  • आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून आपले अधिकाधिक आर्थिक व्यवहार करणे त्यामुळे बँक खातेदारांना शक्य होणार आहे.
  • रोख रक्कम वा चलनाला अन्य पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यूआयडीचे सीईओ ए.बी.पांडे यांनी सांगितले.
  • व्यवहारातील दोन्ही व्यक्तींची बँक खाती आधार कार्डशी जोडलेली असतील तरच 12 अंकी क्रमांकाच्या साह्याने ऑनलाइन व्यवहार करता येईल.

मोहना कारखानीस यांना राज्य साहित्य पुरस्कार जाहीर :

  • अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने साहित्यिका मोहना कारखानीस यांना चौथे हुतात्मा छत्रपती शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2016 जाहीर झाला आहे.
  • तसेच त्यांच्या ‘जाईचा मांडव’ या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार असून, 25 डिसेंबरला न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात होणाऱ्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
  • मोहना कारखानीस यांनी कथा, कविता, बालकथा लिहल्या असून अनेक दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.
  • सावित्रीच्या लेकी या 100 कर्तबगार महिलांच्या गाथामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दिनविशेष :

  • 3 डिसेंबर हा भारतात वकील दिन म्हणून साजरा करतात.
  • 3 डिसेंबर 1884 हा स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.