Current Affairs of 29 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 जुलै 2017)

चालू घडामोडी (29 जुलै 2017)

पंतप्रधानांच्या हस्ते अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. अब्दुल कलाम यांचा 27 जुलै हा दुसरा स्मृतीदिन असून त्या निमित्ताने रामेश्वरम येथे त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
  • तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथे ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी अब्दुल कलाम यांच्या एका पुतळ्याचे अनावरण केले, आणि आदरांजली वाहिली.
  • स्मारकाच्या माध्यमातून अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास उलगडला गेला असून त्यांच्या आठवणीही जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘कलाम संदेश वाहिनी’ बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या बसमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले असून देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ही बस प्रवास करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2017)

विश्व क्रमवारीत एच.एस. प्रणय 17 व्या स्थानी :

  • एू स ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटनचा चॅम्पियन भारतीय स्टार एच.एस. प्रणय हा विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या रँकिंगमध्ये 17व्या स्थानावर पोहोचला आहे.
  • जखमेतून परतल्यानंतर कोर्टवर आलेला पारुपल्ली कश्यप याने देखील यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. तो देखील 12 स्थानांची झेप घेत 47व्या स्थानावर दाखल झाला.
  • विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठणारा चौथा भारतीय समीर वर्मा यालादेखील चार स्थानांचा लाभ झाला आहे. तो 28 व्या स्थानावर पोहोचला.
  • तसेच प्रणयने झेप घेताच आता भारताचे चार पुरुष खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये दाखल झाले.
  • किदाम्बी श्रीकांत हा भारतीयांमध्ये अव्वल स्थानावर असून, विश्व रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर आहे.
  • अजय जयराम 16 व्या आणि बी साईप्रणीत 19 स्थानावर आला. महिलांमध्ये पी.व्ही. सिंधू पाचव्या स्थानावर कायम असून, सायना नेहवालची एका स्थानाने घसरण झाल्याने ती 16 व्या स्थानावर आली.

विजयदुर्ग किल्ला होणार आंतरराष्ट्रीय बंदर :

  • विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे.
  • गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल. त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे.
  • विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल; तर दहा हजार थेट रोजगार संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

दिनविशेष :

  • 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन आहे.
  • भारतीय उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांचा जन्म 29 जुलै 1904 मध्ये झाला.
  • 29 जुलै 1922 मध्ये मराठी इतिहाससंशोधक व लेखक ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे’ यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.