Current Affairs of 29 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2017)

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर :

  • तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारे ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक’ 28 डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर झाले.
  • या विधेयकामधील काही तरतुदींवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर त्यात बदल सुचवण्यात आले होते. मात्र, हे बदल सदस्यांचे मतदानाद्वारे पूर्णपणे नाकारले. त्यामुळे अखेर हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
  • तिहेरी तलाकविरोधी कायदा लोकसभेत संमत झाला हा मुस्लीम महिलांसाठी सुवर्णक्षण असून, त्यांच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्यदिन उगवला आहे, अशी भावना मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यदभाई यांनी व्यक्त केली.
  • तसेच एकतर्फी तीनदा तलाक म्हणून घटस्फोट घेत मुस्लीम महिलांवर अन्याय करण्याच्या वृत्तीला या कायद्यामुळे चाप बसणार आहे.

सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • हवाई संरक्षणासाठी भारताने अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची 28 डिसेंबर रोजी यशस्वी चाचणी केली. यामुळे संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठी यशस्वी झेप घेणारा भारत लवकरच अंतराळ क्षेत्रातील ताकदवान देश बनणार आहे.
  • तसेच या क्षेपणास्त्राची विशेष बाब ही आहे की, भारतीय सीमेच्या दिशेने डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची त्याची क्षमता आहे.
  • ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची चाचणी भारताने या वर्षात केलेली तिसरी यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा कानमंत्र :

  • पुढील दोन वर्षांमध्ये रखडलेले सिंचनाचे शंभरहून अधिक प्रकल्प पूर्ण करू या आणि त्याच्या आधारावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकू यात, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रस्ते व महामार्ग आणि जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांना दिला.
  • थोडक्यात शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार यांच्याबरोबर पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांभोवती भाजपची प्रचारमोहीम फिरणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
  • हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या शपथविधीसाठी गेलेले मुख्यमंत्री सिमल्याहून परतल्यानंतर दिल्लीत थांबले होते. त्यानिमित्ताने त्यांनी राज्यातील भाजप खासदारांशी अनौपचारिक संवाद साधला.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘गॅलप’ संस्थेकडून सर्वेक्षण :

  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना पुन्हा एकदा अमेरिकेतील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘गॅलप’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
  • गॅलपच्या सर्वेक्षणामध्ये ओबामा सलग 10 व्या वेळेस यादीमध्ये आघाडीवर राहिले आहेत, तर हिलरी क्लिंटन सलग 16 व्या वर्षी सर्वात जास्त वेळा प्रशंसनीय महिला म्हणून सर्वेक्षणातून निवडण्यात आल्या आहेत.
  • गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र असे असूनही त्यांनी या सर्वेक्षणामध्ये आघाडी घेतली आहे.

विटा नगरपालिकेला महासिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र :

  • विटा नगरपालिकेने शहरात संकलित होणाऱ्या घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्यामधील ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले कंपोस्ट खताला हरित महा सिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात झाले.
  • विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांना प्रदान करून विटा पालिकेला गौरविण्यात आले.
  • नगरपालिकेने तयार केलेल्या कंपोस्ट खताला राज्य शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र मिळवणारी विटा नगरपालिका ही राज्यातील चौथी तर सांगली जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका ठरली आहे.
  • विटा शहरातील घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्यामधील ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले कंपोस्ट खत कृषी विभागाच्या प्रयोगशाळेमधून तपासून घेऊन राज्य शासनाच्या हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रॅण्ड वापरण्यास परवानगी मागितली होती.

एअर इंडियाची किंगफिशर होणार नाही :

  • एअर इंडियाची गत बंद पडलेल्या किंगफिशरसारखी होऊ देणार नाही आणि एअर इंडिया देशाची सेवा करत राहील अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली आहे.
  • विजय मल्ल्या यांची किंगफिशर कंपनी बंद पडली आणि नंतर बँकांना हजारो कोटींचा नुकसान करून मल्ल्याही इंग्लंडला पळून गेले. त्या किंगफिशर एअरलाइनचा संदर्भ राजू यांनी दिला आहे.
  • एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या कुणाचीही नोकरी घालवण्याची आमची इच्छा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे राजू यांनी लोकसभेत बोलताना सांगितले.
  • सध्या एअर इंडियाच्या डोक्यावर 52 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि 2012 मध्ये युपीए सरकारने दिलेल्या 30 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या जीवावर कंपनी तरली आहे.

दिनविशेष :

  • 29 डिसेंबर 1844 हा दिवस कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बनर्जी’ यांचा जन्मदिन आहे.
  • मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला.
  • प्रसिद्ध निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला.
  • 29 डिसेंबर 1971 हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी ‘दादासाहेब गायकवाड’ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/OUrzLodSixA?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.