Current Affairs of 24 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (24 फेब्रुवारी 2018)

शासकीय योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारक :

  • शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीआधारबंधनकारक करण्यात येत आहे. त्यानंतर आता रेशन दुकानात मिळणाऱ्या स्वस्त धान्यासाठी यापुढे आधारकार्ड अनिवार्य केले जाणार आहे.
  • बायोमॅट्रिक शिधापत्रिकाधारकांनाच स्वस्तात धान्य देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्धची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने 23 फेब्रुवारी रोजी फेटाळून लावली. त्यामुळे 1 मार्चपासून आधारकार्डशिवाय स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाणार नाही.
  • शिधापत्रिकाधारकांची चुकीची माहिती दिली गेल्याने 74 हजारांहून अधिक शिधापत्रिका असल्याचा आक्षेप नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते अझीझ पठाण यांनी घेतला.
  • सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये अन्नधान्य देताना बायोमॅट्रिकचा डाटा आधारकार्डच्या डाटासोबत पडताळणी करून दिला जाणार आहे.

एच-1बी व्हिसाचे नियम आणखी कडक :

  • अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम आणखी कडक केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने या व्हिसा धोरणांमध्ये केलेल्या नव्या बदलांचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत कामानिमित्त गेलेल्या लोकांवर होणार आहे. यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एवढेच नाही तर बदललेल्या नियमांचा परिणाम त्या कर्मचाऱ्यांवरही होणार आहे जे एक किंवा एकापेक्षा अधिक अमेरिकन कंपन्यांसाठी काम करतात.
  • या धोरणांमधील बदलांनंतर कंपन्यांना हे देखील निश्चित करावे लागणार आहे की, त्यांचे H-1B व्हिसावरील कर्माचारी तिसऱ्या कंपनीसाठी काम करीत आहेत. जर कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि जर अमेरिकेत त्यायोग्य कर्मचारी नसतील तेंव्हाच अमेरिकन कंपन्यासाठी H-1B व्हिसाच्या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिकांना अमेरिका व्हिसा प्रदान करेन.
  • तसेच या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतीय आयटी कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कारण भारतीय आयटी कंपन्या अनेक काळापासून H-1B व्हिसाचा लाभ घेत आहेत.

इंडिया रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन :

  • फर्स्ट टेक चालेंज व इंडस रोबोटिक्स सोसायटी वतीने ‘इंडिया रोबोटिक्स चॅम्पिअनशिप’ या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन 24 व 25 फेब्रुवारी रोजी बॉक्सिंग स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन खा. अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडस रोबोटिक्स सोसायटीचे अध्यक्ष विनय कन्वर यांनी दिली.
  • या स्पर्धेत 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोट्स दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यासाठी भारतातील दिल्ली, मुंबई, राजकोट, अहमदाबाद, कोईम्बतूर, पुणे, औरंगाबाद येथील 30 संघ सहभागी झाले आहेत.
  • पाच राउंडमध्ये ही स्पर्धा होणार असून प्रत्येकी अडीच मिनिटांच्या राउंडमध्ये संघांना आपल्या रोबोट्सच्या साथीने विविध आव्हाने पार करायची आहेत.
  • विजेत्या संघाला अमेरिकेतील मिशिगन येथे होणाऱ्या वर्ल्ड रोबोटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती इंडस रोबोटिक्स सोसायटीचे उपाध्यक्ष अश्विन सावंत यांनी दिली. 

राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा :

  • संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 58 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल-मेमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांसाठी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून 23 मार्च रोजी यासाठी मतदान होणार आहे.
  • देशातील 16 राज्यातील राज्यसभेच्या 58 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख 12 मार्च आहे. तर 23 मार्च रोजी यासाठी मतदान होणार आहे.
  • दरम्यान, या निवडणुकांदरम्यान केरळमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेल्या खेळाडूची हकालपट्टी :

  • रशियाच्या अ‍ॅलिना झॅगिटोवा व एवगेनिया मेदवेदेव यांनी फिगर स्केटिंगमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळवत हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. मात्र त्यांची सहकारी नादेझेदा सर्जीयेवा ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्यांचे यश झाकोळले गेले.
  • सर्जीयेवाची दोन वेळा उत्तेजक चाचणी घेण्यात आली. दोन्ही वेळा ती दोषी आढळल्याचे स्पर्धा संयोजन समितीकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे रशियन संघाच्या वैद्यकीय तज्ज्ञानेही त्यास दुजोरा दिला. त्यामुळे तिची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
  • सोची येथे गतवेळी झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या पदक विजेत्या खेळाडूंपैकी अनेक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. त्यामुळे यंदा त्यांच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली सहभागी व्हावे लागले आहे.

दिनविशेष :

  • 24 फेब्रुवारी 1970 रोजी मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती ‘राजाराम’ यांचा जन्म झाला.
  • जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे 24 फेब्रुवारी 1822 रोजी अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.
  • सन 1920 मध्ये 24 फेब्रुवारी रोजी नाझी पार्टीची स्थापना झाली.
  • कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) 24 फेब्रुवारी 1952 पासून सुरूवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.