Current Affairs of 22 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 मार्च 2017)

चालू घडामोडी (22 मार्च 2017)

रॉजर फेडरर ठरला एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धा विजेता :

  • इंडियन वेल्स स्टेनवावरिंकाचा 6-4, 7-5 ने पराभव करीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विक्रमाची बरोबरी साधत पाचव्यांदा एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली.
  • गेल्या वर्षी गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे कोर्टपासून दूर राहिलेल्या फेडररने पुनरागमन करीत जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकत 18 वे ग्रॅण्डस्लॅम आपल्या नावे केले होते.
  • तसेच त्यानंतर स्विस फायनलमधील विजयानंतर फेडररने नोव्हाक जोकोविचच्या पाच विजेतेपदांसोबत बरोबरी साधली. याआधी, फेडररने 2004, 2005, 2006 आणि 2012 मध्ये अजिंक्यपद पटकाविले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मार्च 2017)

नव्या संशोधनाने आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान :

  • दीर्घिकांचा समावेश असलेली महाकाय चकती प्रचंड वेगाने आपल्या पृथ्वीपासून अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने दूर जाताना दिसली असून ती लघु महाविस्फोटाप्रमाणे प्रसरण पावत असल्याची शक्यता आहे त्यामुळे आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान मिळाले आहे.
  • तसेच या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. ही चकती 10 दशलक्ष प्रकाशवर्षे इतकी रूंद आहे व प्रसरण पावत आहे, त्याचे साधम्र्य लघु महाविस्फोटाशी दाखवता येईल.
  • संशोधकांच्या मते आपल्या शेजारची देवयानी दीर्घिका आपल्या आकाशगंगेजवळून गेली होती त्यावेळी काही लघु दीर्घिका तयार झाल्या होत्या.
  • जर आइनस्टाइनचा गुरुत्व सिद्धांत खरा असेल तर आपली आकाशगंगा कधीही देवयानीच्या जवळ यायला नको असे ब्रिटनच्या सेंट अँड्रय़ूज विद्यापीठाचे डॉ. होंगशेंग झाओ यांनी सांगितले.
  • नवीन संशोधन खरे असेल तर आपले गुरुत्वाचे व विश्वाचे ज्ञान बदलणार आहे. दीर्घिकांचा चकतीसारखा संच ही वेगळी बाब नाही. या दीर्घिका पावसाच्या थेंबाची दोऱ्यात गुंफण करावी तशा फिरत्या छत्रीसारख्या अवकाशीय वस्तूतून फेकल्या गेल्या असे याच विद्यापीठाचे पीएचडी विद्यार्थी इंद्रनील बानिक यांनी म्हटले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजीवराजे निंबाळकर :

  • सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीवराजे नाईक निंबाळकरउपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
  • 21 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे सभागृहात जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल (निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्या उपस्थित या निवडी झाल्या.
  • संजीवराजे हे पाचव्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. ते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आहेत.
  • वसंतराव मानकुमरे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थक मानले जातात. त्यांच्या रूपाने जावली तालुक्‍याला प्रथमच उपाध्यक्षपद मिळाले आहे.

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात’ सिंधुदुर्ग प्रथम स्थानी :

  • प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयाने “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” हा उपक्रम यंदा राज्यभरात राबविण्यात आला. त्यातील भाषा व गणित विषयांसाठी झालेल्या पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी एकचे विश्‍लेषण नुकतेच विद्या प्राधिकरणाने जाहीर केले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम, सातारा व्दितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला.
  • पहिली ते आठवीतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्तेची नियमित पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षापासून “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
  • राज्यातील सर्व माध्यमांच्या मान्यता प्राप्त शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात आले.
  • राज्यातील एक कोटी 60 लाख विद्यार्थ्यांची वर्षभरात तीन वेळा शैक्षणिक प्रगती चाचणी, पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील संकलित मूल्यमाफनाच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील पायाभूत चाचणी व संकलित चाचणी एकचा भाषा व गणित विषयातील गुण शाळांनी ‘सरल’ प्रणालीत भरली होती.

जगातील सर्वांत आनंदी देश नॉर्वे :

  • भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) “वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017” मध्ये (जागतिक आनंदी अहवाल) काढलेला आहे.
  • आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉवेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेला डेन्मार्क आता दुसऱ्या स्थानावर आहे.
  • ‘यूएन’च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून गेल्या वर्षी तो 118 व्या स्थानी होता. यंदा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत.
  • तसेच हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा या घटकांची पाहणी करण्यात आली होती.
  • असमतोल, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. आनंदाचे मूल्यमापन एक ते दहा क्रमांकात करण्यात आले आहे.
  • सर्वांत आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास ‘यूएन’ने 2012 पासून सुरवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखविणे हा याचा उद्देश आहे. अहवालात नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्विर्त्झंलंडफिनलंड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.