Current Affairs of 21 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 मे 2018)

चालू घडामोडी (21 मे 2018)

श्री संत तुकाराम महाराज संतपीठ अध्यक्षपदी विजय भटकर :

  • श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरी दिली आहे.
  • तसेच ही समिती संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, अस्थापनेची रचना, वर्गपध्दती व इतर अनुषंगीक कामांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
  • पंढरपूर मंदिरे अधिनियमा मध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्या विषयीची तरतूद आहे. तथापी अनेक मंदिर समित्या होऊन गेल्या परंतु संतपीठ अस्तित्वात आले नव्हते.
  • मागील वर्षी डॉ.भोसले यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी पंढरपूर मंदिर अधिनियमातील तरतूदी नुसार आपण संतपीठाची निर्मिती करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते.
  • त्यानुसारसीच 7 सप्टेंबर रोजी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत ‘संत तुकाराम महाराज संतपीठ’ या नावाने परिसंस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मे 2018)

हौशी खगोलशास्त्रज्ञांकडून बाह्य़ग्रहाचा शोध :

  • रशियातील कोरोवका ग्रहसंशोधन प्रकल्पातील हौशी खगोलशास्त्रज्ञांनी गुरूसारखा तप्त बाह्य़ग्रह शोधला असून त्याचा परिभ्रमण काळ हा 40 तासांचा आहे. मातृताऱ्याभोवती हा ग्रह 40 तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
  • कोरोवका ग्रह संशोधन प्रकल्पात हा बाह्य़ग्रह शोधण्यात आला असून त्याचे नामकरण केपीएस 1बी असे करण्यात आले आहे. त्याचे गुणधर्म हे गुरूसारखे आहेत. तो मातृताऱ्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे त्याचे तापमान हे गुरूपेक्षा जास्तच आहे.
  • रशियाच्या उरल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी बाह्य़ग्रहसदृश खगोलीय वस्तूंचे नमुने शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. असे नमुने निवडल्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या वेधशाळांकडून निरीक्षण केले जाते त्यात रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या स्पेशल अ‍ॅस्ट्रोफिजिकल ऑब्झर्वेटरीचा समावेश आहे. वर्णपंक्तींचा अभ्यास करून सदर बाह्य़ग्रहाचे वस्तुमान काढण्याचे प्रयोग फ्रान्समधील हॉट प्रॉव्हेन्स ऑब्झर्वेटरी येथे केले जातात.
  • संशोधकांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता सध्याचा शोध हा हा महत्त्वाचा असून हौशी खगोलशास्त्रज्ञांनी जमवलेल्या माहितीच्या आधारे उपलब्ध उपकरणांच्या मदतीने ग्रहाचा शोध घेण्यात आला आहे.
  • बेल्जियम, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँडस, तुर्की, पोर्तुगाल, लिथुआनिया, इटली व कॅनडा येथील वैज्ञानिकांचा यात सहभाग होता.
  • नवीन बाह्य़ग्रहाचा शोध हा आपली सौरमाला कशी अस्तित्वात आली व नंतर कशी उत्क्रांत होत गेली यावर प्रकाश टाकणार आहे. या ग्रहाच्या वातावरणाचे तपमान गुरूपेक्षा जास्त आहे कारण तो मातृताऱ्याच्या फारच निकट आहे.

प्रिन्स हॅरी मेगन यांचा शाई विवाह थाटात :

  • ब्रिटनचे राजपुत्र हॅरी (वय 33) हे 19 मे ओझी हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मर्केलशी (वय 36) विवाहबद्ध झाले. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जस चॅपल चर्चमध्ये पार पडलेल्या या समारंभाला सहाशे पाहुणे उपस्थित होते.
  • कॅंटरबरीच्या आर्चबिशपनी या दोघांनाही पती-पत्नी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत नवदांपत्याचे अभिनंदन केले. महाराणी ऐलिझाबेथ द्वितीय यांच्यासह प्रिन्स फिलीप आणि राजपरिवारातील अन्य सदस्यदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.
  • सामान्य लंडनवासीयांना हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहता यावा म्हणून मुख्य रस्त्यांवर स्क्रिन्स लावण्यात आले होते. या समारंभाला मेगनची जवळची मैत्रिण अभिनेत्री प्रियांका चोप्रासह जॉर्ज आणि अमल क्‍लुने, डेव्हिड आणि व्हिक्‍टोरिया बेकहॅम आणि सर एल्टॉन जॉन देखील उपस्थित होते.

चीनने भारतातील बौद्ध भिक्षूंवर बंदी लादली :

  • भारतात दीक्षा घेणाऱ्या तिबेटच्या बौद्ध भिक्षूंच्या प्रवेशावर चीनच्या एका प्रांताने बंदी घातली आहे. हे भिक्षू फुटीरतावादी असून चीनमध्ये फुटीरतावादी विचार पसरवित असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे.
  • शिचुआन प्रांतातील लिटयांग काऊंटीमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने त्याबाबतची माहिती दिली आहे.
  • तिबेटमधून भारतात आलेल्या तरुणांना भारतात बौद्ध भिक्षू बनवले जाते. त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षित केले जाते. त्यामुळेच या भिक्षुंना लिटयांग काऊंटीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
  • दरवर्षी काऊंटीमध्ये देशभक्तीचा क्लास घेतला जातो. त्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. या क्लासमधील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जाते. फुटीरतावादी विचारांच्या विद्यार्थ्यांवर खास करून लक्ष ठेवले जाते, असे सूत्रांनी सांगितले.
  • काही गुरुंना परदेशात 14व्या दलाई लामांकडून बौद्ध धम्माची दीक्षा मिळालेली आहे. आम्ही दलाई लामांना फुटीरतावादी नेते म्हणून पाहतो. त्यामुळेच त्यांनी दीक्षा दिलेल्या प्रत्येक बौद्ध भिक्षूंवर आमची करडी नजर आहे, असे येथील धार्मिक नेते झू वाईकुआन यांनी सांगितले.

पाकव्याप्त काश्मीर भागाचे अधिकार वाढविणार :

  • पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागाला आणखी जास्त प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सरकारी व लष्करी नेतृत्वाने घेतला आहे.
  • गिलगिट-बाल्टिस्तान या वादग्रस्त प्रदेशाला अशा पद्धतीने पाचवे राज्य म्हणून मान्यता मिळविण्याच्या दिशेने जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताचा विरोध असून, असा निर्णय मान्य होऊ शकत नाही, असे भारताने म्हटले आहे.
  • पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान शाहीद खक्कन अब्बासी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद झाली. या बैठकीमध्ये समितीने याविषयीच्या प्रस्ताचा आढावा घेतला व त्यानंतरच्या चर्चेमध्ये एकमताने पाकव्याप्त काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तानच्या सरकारांना अधिक प्रशासकीय व वित्तीय अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • मात्र, पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान परिषदांचा सल्लागार मंडळ म्हणून असणारा दर्जा कायम ठेवण्यावरही या बैठकीमध्ये एकमत झाले; तसेच गिलगिट-बाल्टिस्तान परिसरातील विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा विभाग पाच वर्षे करमुक्त ठेवून पुरेसा निधी निर्माण करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

  • 21 मे 1881 मध्ये वॉशिंग्टन (डी.सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
  • पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना 21 मे 1904 रोजी झाली.
  • पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे 21 मे 1991 रोजी आत्मघातकी पथकाने हत्या केली.
  • 21 मे 1994 मध्ये 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.