Current Affairs of 20 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 मे 2017)

चालू घडामोडी (20 मे 2017)

शिक्षण आणि आरोग्यसेवा करमुक्त असणार :

  • शिक्षण आणि आरोग्यसेवांवर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) न लावण्याचा निर्णय घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला.
  • मात्र, त्याचबरोबर दूरसंचार, विमा, बँकिंग सेवा तथा बिझनेस क्लास विमान प्रवासावर अधिक कर लावण्यात आला असून, या सेवा महागणार आहेत.
  • 1 जुलै 2017 पासून लागू होणाऱ्या जीएसटी प्रणालीतहत बहुतांश वस्तूंसह सेवाक्षेत्रासाठीचे कर दर निश्चित करण्यात आले आहेत.
  • स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच करप्रणालीत व्यापक बदल करून भारतीय अर्थव्यवस्थेने ‘एक राष्ट्र, एक कर’ या नवपर्वात पदार्पण करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.
  • श्रीनगर येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सेवाक्षेत्रांसाठीही जीएसटी दर निश्चित करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मे 2017)

कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना :

  • सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली आहे.
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसजवळ किवळे येथे 15 एकराच्या विस्तृत जागेत विद्यापीठाचा कॅम्पस उभारण्यात आला असून राज्य शासनाने त्याला नुकतीच मान्यताही दिली आहे.
  • कारखाने आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील अनुभवात्मक शिक्षण मिळावे तसेच उद्योग आणि बाजारपेठेत नोकरीसाठी प्रशिक्षित युवक उपलब्ध व्हावेत या हेतूने सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याची माहिती सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार व प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनी दिली.
  • स्कूल ऑफ ऑटोमोबाईल अ‍ॅन्ड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, रिटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, अर्बन डेव्हलपमेंट, ब्युटी अ‍ॅन्ड वेलनेस, हेल्थ सायन्सेस अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, पब्लिक पॉलिसी अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आदी कोर्सेसचा या विद्यापीठामध्ये समावेश असणार आहे.

सिंधुदुर्गमध्ये होणार पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा :

  • राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच कार्यान्वित होत असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत या कार्यशाळेच्या उभारणीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • संसर्गजन्य संशोधन प्रयोगशाळेत सूक्ष्मजीव शास्त्र, विषाणू विभाग, रक्तातील पातळ द्रव्याच्या अभ्यासाचा विभाग व रेण्वीय विभाग, असे चार विभाग कार्यरत राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
  • तसेच इथे एकूण 13 रोगांवरील तपासण्या होणार आहेत. या प्रयोगशाळेत वीजपुरवठा अखंड उपलब्ध राहावा, यासाठी जनरेटर सुविधा, तसेच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम लवकरात-लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन :

  • सच्चे पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, सामाजिक कार्यकत्रे, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे केंद्रीय वनेपर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे (वय 60) यांचे 18 मे रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झोपेत निधन झाले.
  • मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्याच्या धक्कादायक निधनानंतर आदरांजलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बठक बोलावली आणि त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा विशेष ठरावही संमत केला.
  • तसेच शोक प्रगट करण्यासाठी देशभरातील सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वजही अध्र्यावर आणण्यात आले. दरम्यान, वने व पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविला.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले दवे अविवाहित होते. त्यांच्यामागे इंदूरस्थित अभय दवे हे बंधू आहेत.

दिनविशेष :

  • आधुनिक मराठी गद्याचे जनक ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांचा जन्म 20 मे 1850 मध्ये झाला.
  • 20 मे 1932 हा भारतीय स्वातंत्र्यसैनिक ‘बिपिनचंद्र पाल’ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.