Current Affairs (चालू घडामोडी) of 2 January 2015 For MPSC Exams

 Current Affairs (चालू घडामोडी) of 2 January 2015

अ.क्र
ठळक घडामोडी
1. नियोजन आयोग झाला ‘नीती आयोग’
2. “हिम्मत”चे उद्घाटन
3. दहशतवादविरोधी मोहिमेच्या थेट प्रेक्षेपणावर बंदी
4. दिनविशेष

 

 

नियोजन आयोग झाला ‘नीती आयोग’ :

  • देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका निभावणार्‍या नियोजन आयोगाचे आता नीती आयोग असे नामकरण करण्यात आले आहे.
  • नीती आयोगाच्या कार्यकारिणीमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचा समावेश असेल असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्याचा विकास होण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा मोदी सरकारने व्यक्त केली आहे.
  • नियोजन आयोगाची स्थापना 1950 च्या सुमारास झाली होती.

नीती आयोगाची रचना पुढीलप्रमाणे-

  • अध्यक्षपंतप्रधान
  • नियामक परिषदसर्व राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशचे नायाब राज्यपाल.
  • क्षेत्रिय परिषदगरजेनुसार स्थापना, यात त्या भागातील राज्यांचे मुख्यमंत्री व नायाब राज्यपाल.
  • पूर्णवेळ सदस्यसंख्या कालांतराने ठरेल.
  • अर्धवेळ सदस्यजास्तीत जास्त दोन, देशातील नामांकित विद्यापीठे आणि संशोधक संस्थांमधून आळीपाळीने निवड.
  • पदसिद्ध सदस्यजास्तीत जास्त चार केंद्रीय मंत्री पंतप्रधानांकडून नामनिर्देशन.
  • विशेष निमंत्रितठराविक विषयाचे तज्ञ.
  • उपाध्यक्षपंतप्रधानांकडून नेमणूक.
  • मुख्य कार्यकारी अधिकारीनिश्चित काळासाठी पंतप्रधानांकडून नियुक्ती, सचिवाचा हुद्दा.

“हिम्मत”चे उद्घाटन :

  • महिलांच्या सुरक्षतेसाठी दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या “हिम्मत” या मोबाइलचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले.
  • संकटात असतांना या मोबाइलचा वापर करूनमहिलांना पोलिसांची मदत मिळणार आहे.

 

दहशतवादविरोधी मोहिमेच्या थेट प्रेक्षेपणावर बंदी :

  • दहशतवादी हल्ल्याच्यावेळी सुरक्षा दलांच्या मोहिमेचे थेट प्रेक्षेपण करण्यास बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.
  • गृहमंत्रालयने माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून कॅबल टेलिव्हीजन नेटवर्क रूल्समध्ये दुरूस्ती करण्याची सूचना केली आहे.

दिनविशेष :

  • 1881– लोकमान्य टिळकांनी ‘मराठा‘ हे नियतकालिक सुरू केले.
  • 1942– दुसर्‍या महायुद्धात हेलीकॉप्टरचा प्रथम वापर झाला.
  • 1985– फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन.
  • 1959– रशियाने ‘ल्युना 1‘ हे यान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.