Current Affairs of 18 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जुलै 2017)

चालू घडामोडी (18 जुलै 2017)

ठाण्यामध्ये उभारणार दुसरे कृषी समृद्धी केंद्र :

  • मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. हे केंद्र कल्याण तालुक्यातील मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे, आंबिवली तर्फे वासुंद्री येथे उभारण्यात येणार आहे.
  • तसेच याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.
  • राज्यातील 10 जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने या मार्गावरील प्रस्तावित 24 समृद्धी केंद्रे अर्थात, टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जुलै 2017)

व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार :

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
  • दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.
  • व्यंकय्या नायडू यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व घटकपक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे शहा यांनी सांगितले.
  • तसेच यावेळी अमित शहा यांनी नायडू यांच्या राजकीय कारकीर्दीचा नव्याने परिचयही करून दिला.

अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी पहिली भारतीय कंपनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ :

  • देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.
  • अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी महिंद्रा अँड महिंद्रा पहिलीच भारतीय कंपनी ठरणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात डेट्रॉयटमध्ये उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.
  • अमेरिकेचा समावेश जगातील महत्त्वाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठांमध्ये होत असल्याने या देशात विस्तार करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
  • महिंद्रा अँड महिंद्राने अमेरिकेत 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या अमेरिकेतील उत्पादन केंद्रामुळे 3 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
  • कंपनीकडून अमेरिकेतील उत्पादन केंद्रात ऑफ रोड वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. या वाहनांचे डिझाईन कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील तंत्रज्ञान केंद्रात तयार केले जाणार आहे.

दिनविशेष :

  • दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, तसेच लोकप्रसिद्ध ‘नेल्सन मंडेला’ यांचा जन्म 18 जुलै 1918 मध्ये झाला.
  • सन 1968 मध्ये 18 जुलै रोजी इंटेल कंपनीची स्थापना झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जुलै 2017)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.