Current Affairs (चालू घडामोडी) of 17 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सैफ अली खानचा पद्मश्री परत घेणार
2. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र प्रथम
3. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत
4. मोदींनी केलेत मॉरिशस सोबत पाच करार
5. मोदींचा शेतकर्‍यांशी संवाद
6. दिनविशेष

 

 

 

सैफ अली खानचा पद्मश्री परत घेणार :

  • मोदी सरकारने बॉलीवूडमधील अभिनेता सैफ आली खानचा पद्मश्री परत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
  • अनिवासीत भारतीयाला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तिला पुरस्कार देत येत नसल्याने पुरस्कार परत घेतल्या जावा अशी मागणी केली जात आहे.
  • कला व मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 2010 मध्ये सैफ आली खानला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र प्रथम :

  • महाराष्ट्र बलात्कार व विनयभंग घटनांमध्ये अव्वल स्थानावर असल्याची घटना उघडकीस आली आहे.
  • महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्यप्रदेश तसेच आंध्रप्रदेश ह्या राज्यांचे क्रमांक आहेत.
  • महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज लोकसभेत संगितले.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेत :

  • देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय लोकसेवा संघाच्या भारतीय प्रतींनिधी सभेत संमत करण्यात आला.
  • केंद्र व राज्य शासनांनी भाषेविषयक धोरणाचा आढावा घ्यावा व प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची व्यवस्था करावी असे अहवान करण्यात आले.

मोदींनी केलेत मॉरिशस सोबत पाच करार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील प्रकल्पांसाठीकमी व्याजदरात पाच हजार कोटी डॉलरचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली असून त्यांनी मॉरिशस सोबत पाच करार केलेत.
  • मॉरिशससोबतचे पाच करार
  1. आंब्यांची आयात
  2. सांस्कृतिक सहकार्य करार
  3. बेटांचा विकास
  4. पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा सहकार्य
  5. सागरी व्यापारात वाढ

मोदींचा शेतकर्‍यांशी संवाद :

  • आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.
  • 22 मार्चला पंतप्रधान मोदी ‘मन की बात मधून’ शेतकर्‍यांशी बोलणार आहेत.

दिनविशेष :

  • 1955आयएसआय रेग्युलेशन 1955 अमलात आला.
  • 1969गोल्डा मायर यांनी इस्त्राईलच्या पंतप्रधानपदाचा कारभार हाती घेतला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.