Current Affairs of 17 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (17 जानेवारी 2018)

हज यात्रेचे अंशदान केंद्र सरकारकडून पूर्ण बंद :

  • हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
  • केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून सुप्रीम कोर्टाने 2012 मध्येच टप्प्याटप्प्यात हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याची आदेश सरकारला दिले होते.
  • हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
  • जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे श्रद्धास्थान असून भारतातील हजारो मुस्लीम या यात्रेसाठी जातात. केंद्र सरकारच्या हज धोरणाचा मसुदा ऑक्टोंबरमध्ये सादर करण्यात आला होता.
  • 16 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याची घोषणा केली.

पहिले आंतरराष्ट्रीय बेणे इस्रायल अधिवेशन :

  • इस्रायल भारताचा मित्र राष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे. सैनिकी संसाधनात भारताला मदत मिळतेय. तेथील टेक्नोलॉजी आपण वापरतोय. शस्त्रास्त्रे घेतोय. कोरड वाहू शेतीचे ज्ञान घेण्यासाठी हजारो शेतकरी इस्रायलला जात असतात. यात मोठ्या प्रमाणात तंत्र ज्ञानाची आदान प्रदान होतेय.
  • दोन हजार वर्षांपूर्वी एका जहाजाने प्रवास करताना जहाज फुटले आणि त्यातील काही वाचलेली लोकं आपल्या देशात आली. ती ही इस्रायली ज्यू लोकं भारतात राहून समरस झाली.
  • इस्राईल लोकांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान दिलेले आहे. त्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यापूर्वी कोण ज्यु आहेत कोण नाही या बाबतीत स्पष्टता निर्माण झाली आणि हा दर्जा दिल्यास त्याचा गैरवापर होणार नाही एवढी काळजी घेतल्यास त्यांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी मान्य होण्यास काहीच अडचण येणार नाही. असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझगाव येथील भारतातील इस्रायली समाजाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बेणे इस्रायल अधिवेशनात जाहिर केले.

लवकरच संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी होणार :

  • प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकोलच्या प्लेट्‌स, ताट, वाट्या, चमचे, कप, ग्लास, बॅनर्स, तोरण, ध्वज आदी सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेस्टन याचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास संपूर्ण राज्यात लवकरच बंदी घालण्याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.
  • प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकची इतर उत्पादने ही नैसर्गिक व जैविक दृष्ट्या विघटनशील नसल्याने त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. जलनि:सारणास अवरोध निर्माण होऊन पाणी तुंबते व त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
  • प्लॅस्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लॅस्टिकचा संपूर्णपणे वापर थांबावा, निर्मिती थांबावी म्हणून लवकरच शासनातर्फे बंदी घालण्याचे प्रयोजन आहे.

एअर एशिया इंडियाची मोठी ऑफर :

  • एअर एशिया इंडिया विमान कंपनीने विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक अविश्वसनीय ऑफर आणली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना फक्त 99 रुपयांत देशातील एक दोन नव्हे तर तब्बल 7 शहरांत विमानाने प्रवास करता येणार आहे. 15 जानेवारी पासून ही ऑफर सुरु झाली आहे.
  • ‘कोणीही विमान प्रवास करू शकतो’, अशी टॅगलाइन वापरुन एअर एशियाने सामान्य नागरिकांना विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न दाखवले होते. 14 जानेवारी रोजी या कंपनीकडून अवघ्या 99 रुपयांत विमान प्रवास करता येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
  • तसेच यानुसार सामान्य प्रवाशांना पुणे, नवी दिल्ली, बेंगळुरू, कोची, कोलकाता आणि रांची या शहरात अवघ्या 99 रुपयांत प्रवास करता येणार आहे.
  • भारतात एअर एशियाची विमान सेवा सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या एअर एशियाची 16 शहरांत विमान सेवा सुरू आहे.

हिमांशी रुपारेल ठरली मिस महाराष्ट्र मिररची विजेती :

  • वर्धा येथील दत्ता मेघे फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला महोत्सव 2018’ मध्ये फॅशन शो नुकताच पार पडला. त्यामध्ये अकोल्यातील हिमांशी चंद्रकांत रुपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर 2018’ हा सन्मान प्राप्त केला.
  • या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता ठरविणारी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीसाठी शेकडो युवतींनी सहभाग घेतला होता. त्यामधून ठराविक 16 युवतींची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली होती.
  • तसेच या युवतीमधून अखेर हिमांशी रुपारेल हिने बाजी मारत अकोल्याच्या नावलौकिकात भर घातली. हिमांशी ही अकोल्यातील भाजपाच्या महिला नेत्या शितल रुपारेल यांची मुलगी आहे.

महाराष्ट्र कुस्ती लीगचे यजमानपद पुण्याला :

  • महाराष्ट्र राज्य कुस्ती वर्तुळात चर्चेत असलेली ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ 9 ते 18 मार्च या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे.
  • कुस्तीचा खेळ महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचवण्यासाठी ‘ताकदीची कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती’ हे घोषवाक्य घेऊन झी टॉकीजने या लीगचे आयोजन केले आहे.
  • तसेच या लीगच्या सर्व लढती पुण्यात खेळवण्यात येणार आहेत.

दिनविशेष :

  • 17 जानेवारी 1906 रोजी भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म झाला.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक सन 1946मध्ये 17 जानेवारी रोजी झाली.
  • सन 1956मध्ये 17 जानेवारी रोजी बेळगाव-कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.