Current Affairs (चालू घडामोडी) of 16 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे
2. स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड
3. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार’
4. यूएनईपी सल्लागार मंडळात जयराम रमेश
5. क्रिकेट खेळतांना आणखी एका भारतीयाचा मृत्यू
6. सिडनी : ओलिस नागरिकांमध्ये भारतीयाचा सामावेश

 

जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे :
  • आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

 

स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड :
  • दुखापत बळावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्कने भारताविरुद्धच्या कसोटीतून मालिकेतून माघार घेतल्यानंतर स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ति करण्यात आली आहे.
  • स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा 45वा आणि सर्वात तरुण कप्तान आहे.

 

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार’ :
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार असे आश्वासन राज्याचे उच्च शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
  • ठाण्यात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे‘ च्या राज्यस्तरीय ‘प्रतिभा संगम‘ या संमेलनात बोलत होते.

 

यूएनईपी सल्लागार मंडळात जयराम रमेश :
  • विकसनशील देशांना पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल तंत्रज्ञानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेला धोरणात्मक सल्ला देणार्‍या एका मंडळाच्या सदस्यपदी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जापानच्या आसोका शहरात असलेल्या या आयईटीसीची स्थापना करण्यात आली आहे.

 

क्रिकेट खेळतांना आणखी एका भारतीयाचा मृत्यू :
  • 32 वर्षीय प्रमोद थेराईल याचा मृत्यू.
  • भारतीय व्यक्तीचा क्रिकेट खेळतांना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

 

सिडनी : ओलिस नागरिकांमध्ये भारतीयाचा सामावेश :
  • ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील लिंडेट कॅफे येथे दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्या नागरिकांमध्ये एका भारतीय नागरिकाचा सामावेश आहे.
  • हा नागरिक इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपनीमध्ये कार्यरत आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.