Current Affairs of 13 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2017)

मार्टिना हिंगिसचे 25वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद :

  • मार्टिना हिंगिसने तैवानच्या चॅन युंग-जॅनसह खेळताना अमेरिकन खुल्या टेसिन स्पध्रेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
  • स्वित्र्झलडच्या या 37 वर्षीय खेळाडूचे कारकीर्दीतील 25वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे.
  • हिंगिसयुंग-जॅन यांनी अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी हॅराडेका आणि कॅटेरिना सिनिआकोव्हा यांच्यावर 6-3, 6-2 असा सहज विजय मिळवला.
  • हिंगिसने महिला दुहेरीतील 13, महिला एकेरीत पाच आणि मिश्र दुहेरीत 7 ग्रॅण्डस्लॅम नावावर केले आहेत.
  • मार्टिना हिंगिसने 1997 मध्ये अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पध्रेतील एकेरीचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिने 1998 आाणि 1999 मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत याची पुनरावृत्ती केली.
  • या हंगामातील हिंगिसचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. तिने विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पध्रेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद नावावर केले आहे. तसेच यंदा सहा डब्लूटीए दुहेरी विजेतेपदही तिच्या नावावर आहेत.

प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार :

  • भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे.
  • नवी दिल्ली येथे लवकरच एका समारंभात हा पुरस्कार दिला जाईल, महासंघाचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांनी ही माहिती दिली.
  • बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारिणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
  • प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते.
  • तसेच 1978 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर 1983 मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते.

अॅपल कंपनीकडून तीन नवे मोबाईल लाँच :

  • अॅपल कंपनीने तीन नवे फोन्स 12 सप्टेंबर रोजी लाँच केले. आयफोन 8 (Apple iPhone 8), आयफोन 8 प्लस (Apple iPhone 8 Plus) आणि आयफोन एक्स (Apple iPhone X) हे स्मार्टफोन्स एका शानदार सोहळ्यात अॅपलकडून लाँच करण्यात आले.
  • मात्र सध्या जगभरात आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसपेक्षा अधिक चर्चा आयफोन एक्सची होताना दिसते आहे.
  • अॅपल कंपनीच्या दशकपूर्तीनिमित्त लाँच करण्यात आलेला आयफोन एक्स हा अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र या फोनची किंमतही तितकीच जास्त आहे.
  • आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसच्या तुलनेत आयफोन एक्समधील वैशिष्ट्ये अतिशय हटके आहेत. त्यामुळेच या फोनची किंमत इतर दोन्ही फोन्सच्या तुलनेत जास्त आहे.
  • आयफोन एक्सच्या 256 जीबीच्या मॉडेलची किंमत 1,149 डॉलर इतकी आहे. त्यामुळे भारतात हा फोन खरेदी करण्यासाठी 1 लाख 2 हजार रुपये मोजावे लागतील. या फोनचे 64 जीबीचे मॉडेलदेखील कंपनीने लाँच केले आहे. त्याची किंमत 999 डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतात हा फोन खरेदी करायचा झाल्यास, 89 हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल.

आरबीआय कडून शंभर रुपयांचे नाणे चलनात येणार :

  • दोनशे रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ‘अण्णाद्रमुक’ पक्षाचे संस्थापक एम.जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्त सरकारने शंभर आणि पाच रुपयाचे नवे नाणे आणण्याची घोषणा केली.
  • आर्थिक व्यवहार आणखी सुलभ करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. एम.जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने शंभर आणि पाच रुपयांचे नवे नाणे आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच यातील शंभर रुपयाच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम तर 5 रुपयाच्या नाण्याचे वजन 5 ग्रॅम असेल. नाण्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के कॉपर, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल.
  • एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी 1972 मध्ये ‘द्रविड मुन्नेतत्र कळघम’ (द्रमुक) या पक्षातून फुटून अ.भा. अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाची स्थापना केली होती.
  • तसेच एमजीआर यांनी 1977, 1980 तसेच 1984 मध्ये मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 1989 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

भारत-बेलारुसमध्ये 10 करारांवर स्वाक्षऱ्या :

  • भारत व बेलारुसने 12 सप्टेंबर रोजी विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढविण्यासंदर्भात दहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • संरक्षण क्षेत्राचा संयुक्त विकास करण्याबाबतच्या एका सामंजस्य करारावरही उभय देशांमध्ये एकमत झाले.
  • बेलारुसचे अध्यक्ष ए.जी. लुकाशेंको दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
  • दोन देशांमध्ये आर्थिक भागीदारी वाढविण्यावर भर देणे, हा या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता. या वेळी उभय देशांत संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याविषयी 10 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • लुकाशेंको यांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत व बेलारुसमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेल्या घटनेला 25 वर्षे पूर्ण झाली असून, लुकाशेंको यांच्याशी झालेल्या चर्चेत आम्ही उभय देशांतील द्विपक्षी संबंधाच्या संरचनेचा आढावा घेतला. दोन्ही देश हे संबंध आणखी वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहेत.”

दिनविशेष :

  • किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार ‘गानप्रभा’ डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 मध्ये झाला.
  • 13 सप्टेंबर 2003 मध्ये ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.