भारतातील बँका बद्दल माहिती

Category: Economics (अर्थशास्त्र) Published on 26 May 2016
Written by Shital Burkule Hits: 20871

भारतातील बँका बद्दल माहिती

सार्वजनिक क्षेत्रातील बँका (Public Sector Bnaks) -

1. SBI समूह - SBI आणि तिच्या पाच सहयोगी बँका.

 

2. 19 राष्ट्रीयीकृत बँका.

 

3. प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) (मात्र त्यांच्या विलिनीकरणार्‍या धोरणांमुळे त्यांची संख्या फेब्रुवारी 2013 पर्यंत 82 एवढी कमी झाली आहे.)

 

खाजगी क्षेत्रातील बँका (Private Sector Banks) -

1. भारतीय खाजगी बँका -

a. जुन्या खाजगी बँका -

1. फेडरल बँक मर्या.

2. वैश्य बँक मर्या.

3. करूर वैश्य बँक मर्या.

4. युनायटेड वेस्टर्न बँक मर्या. (आयडीबीआय बँकेत विलीन)

5. कर्नाटक बँक मर्या.

6. बँक ऑफ मदुरा मर्या.

7. सांगली बँक मर्या.

8. लक्ष्मी विलास बँक मर्या.

9. धनलक्ष्मी बँक मर्या.

10. नेंदुगडी बँक मर्या.

11. लॉर्ड कृष्ण बँक मर्या.

 

b. नव्या खाजगी बँका-

c. स्थानिक क्षेत्रीय बँका -

1. या बँकांचे कार्यक्षेत्र तीन सलग जिल्ह्यांचा प्रदेश असेल. (Area of 3 contiguous districts)

2. त्यांचे भाग-भांडवल किमान 5 कोटी रुपये असावे.

3. भाग-भांडवलपैकी प्रवर्तकांनी (जे व्यक्ति, कंपन्या, ट्रस्टस, सोसायट्या इ. असू शकतात) किमान 2 कोटी रुपये पुरवावे.

4. या बँकांचे नियंत्रण RBI कायदा, 1934, बँकिंग नियंत्रण कायदा, 1949 तसेच, RRBs कायदा, 1976 च्या अंतर्गत चालेल.

5. या बँकांना भांडवल पर्याप्तता गुणोत्तर किमान 8 टक्के इतके साध्य करावे लागेल.

6. बँकांना आपल्या 3 जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रांबहर शाखा काढता येणार नाही.

 

2. परकीय व्यापारी बँका -

परदेशात कार्य करणार्‍या भारतीय बँका :

1. बँक ऑफ बडोदाच्या 20 देशांमध्ये मिळून सर्वाधिक म्हणजे 46 शाखांसहित 59 परकीय कार्यालये आहेत.

2. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 29 देशांमध्ये मिळून 42 शाखांसहित 59 परकीय कार्यालये आहेत.

3. बँक ऑफ इंडियाच्या 14 देशांमध्ये मिळून 24 शाखांसहित 33 परकीय कार्यालये आहेत. जगातील देशांनुसार भारतीय बँकांच्या सार्वधिक म्हणजे शाखा U.K. मध्ये तर त्याखालोखाल शाखा फिजी या देशामध्ये आहे.